Month: August 2026


  • अमरावती मध्ये भव्य तृतीय विदर्भस्तरीय सायकल स्पर्धा संपन्न

    अमरावती मध्ये भव्य तृतीय विदर्भस्तरीय सायकल स्पर्धा संपन्न

    अमरावती सायकल असोसिएशन, दिशा संस्था आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तथा सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने विदर्भ स्तरीय तृतीय भव्य सायकल स्पर्धा संपन्न झाली. अमली पदार्थ विरोधी अभियान अंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पोलीस मुख्यालय अमरावती शहर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा घेण्यात आली. या सायकल स्पर्धेमध्ये बारा वर्षाखालील, पंधरा वर्षाखालील, अठरा वर्षाखालील मुले मुली तसेच खुलेवयोगट व 40 वर्षावरील पुरुष व महिलांसाठी 50 किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धकांच्या सुरक्षेला आणि सुविधेला संघटनेने सर्वोच्च प्राधान्य दिले सर्व स्पर्धकांसाठी हेल्मेट बंधनकारक होते. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रथमोपचार व तज्ञ वैद्यकीय सेवा पूर्णवेळ उपलब्ध केल्या गेली सर्व वयोगटातील विजयी स्पर्धकांना आकर्षक प्रथम 5000 द्वितीय 3000 आणि तृतीय 2000  तसेच मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच ज्या स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांना फिनिशर मेडल व ई सर्टिफिकेट देण्यात आले व प्रत्येक नोंदणीकृत स्पर्धकास आकर्षक टी-शर्ट सुद्धा भेट देण्यात आले. स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक म्हणून रघुवीर मिठाईया, बाहेती ब्रदर्स, गेल इंडिया, पनपालिया बिल्डर्स सलुजा सेलिब्रेशन इत्यादी लोकांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉ. अनिल बोंडे खासदार राज्यसभा, रवीभाऊ राणा आमदार, नितीनजी धांडे अध्यक्ष विदर्भयुथ वेल्फेअर सोसायटी, श्री यशवंत सोळंके  पोलीस उपायुक्त, प्रांजली सोनवणे पोलिस उपायुक्त अमरावती शहर डॉक्टर पराग नवलकर विभागीय उपायुक्त एक्साईज विभाग, माधुरी चेंडके ,सचिव हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, जगविंदरसिंग सलुजा, डॉक्टर श्रीनिवास देशपांडे प्राचार्य शारीरिक शिक्षण विभाग हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती प्राचार्य कॉलेज ऑफ बडनेरा इंजीनियरिंग, रवी कोल्हे, नितीन सराफ इत्यादी पाहुणे उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते फ्लाग ऑफ करून स्पर्धेला आरंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी, उपाध्यक्ष संजय मेंडसे, सचिव अतुल कळमकर यांचे हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण 385 स्पर्धकांनी भाग घेतला. ज्यामध्ये बारा वर्षाखालील मुलांमध्ये चिराग खोकले प्रथम, यश धानोरकर द्वितीय, श्रीतेज भोयर तृतीय क्रमांक .  तसेच मुलींमध्ये राजलक्ष्मी मोहळे प्रथम, प्रांजल मार्कंडे द्वितीय, खुशाली हनवते तृतीय असा क्रमांक आला. पंधरा वर्षाखाली गटामध्ये मुलांमध्ये अंशुमन ठाकरे प्रथम, मोहित गिरी द्वितीय, व अनय बगाडे तृतीय व मुलींमधून क्षितिजा बुंदेले प्रथम, मनवा पाबळे द्वितीय, लावण्या घाडगे तृतीय खुल्या प्रवर्गामध्ये पुरुषांमध्ये राजेश जाधव प्रथम, विवेक पवार द्वितीय, प्रणय लांजेवार तृतीय, तसेच मुलींमध्ये वृषाली काळबांडे प्रथम, प्रिन्सेस रामावत द्वितीय, असा क्रम होता. 18 वर्षाखालील मुलांमधून श्रेयांश राऊत प्रथम, सुजल कोहळे द्वितीय, परम खोरगडे तृतीय, तसेच मुलींमधून रुचिका वासनिक प्रथम, प्राची इंगळे द्वितीय,श्रेयांश झाडे तृतीय क्रमांक मिळवला.  चाळीसच्या वरील वयोगटांमध्ये पुरुषांमध्ये प्रशांतराव काळबांडे प्रथम केशव निकम द्वितीय व रमेश विठोरे तृतीय तसेच महिलांमध्ये वर्षा सदार प्रथम, दीपमाला साळुंखे द्वितीय, आणि दिव्या मेश्राम तृतीय असा क्रमांक पटकावला. या सर्व विजयी स्पर्धकांचे सन्मानचिन्ह देऊन व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये रीम्स हॉस्पिटल, झेनिथ हॉस्पिटल, दुर्वांकुर व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यामार्फत वैद्यकीय चमू तसेच ॲम्बुलन्स ची व्यवस्था करण्यात आली होती. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे 65 स्वयंसेवक यांनी अथक परीक्षण घेतले तसेच अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या महिला सदस्यांनी स्पर्धेच्या आधी दोन दिवस संपूर्ण जबाबदारी चोखपणे पार पाडली. वाहतूक शाखे कडून विविध स्थळी बंदोबस्त लावण्यात आला. त्यामुळे  कुणालाही दुखापत न होता स्पर्धा पार पडली. ह्या भव्य स्पर्धेच्या आयोजन सचिव डॉक्टर लक्ष्मीकांत खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण जयस्वाल, सचिन पारेख, पियुष क्षीरसागर , राजूभाऊ देशमुख , ऋषिकेश इंगोले, डॉक्टर सुरीता डफले यांनी अथक परिश्रम घेतले तसेच अमरावती सायकलींग असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेतला व मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण खांडपासोळे, नीता कक्कड यांनी केले व आभार प्रदर्शन श्री संजय मेंडसे यांनी केले.

    Read more