दि. 19 जून रोजी सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सायकलींग फेडरेशन ऑफ इंडिया खेलो इंडिया व स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सोबत अमरावती सायकलींग असोसिएशन तर्फे आयोजित अस्मिता वुमेन सायकलिंग जिल्हा लीगचे यशस्वी आयोजन संपन्न झाले. आज सकाळी साडेपाच पासूनच या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची नोंदणी व त्यांचे रजिस्ट्रेशन हे संपन्न करून सर्वात प्रथम 19 वर्षाखाली मुलींची स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेकरिता अमरावतीतील मा. निवासी उपजिल्हाधिकारी श्री संतोषजी काकडे तसेच मा. पोलीस उपायुक्त श्री रमेशजी धुमाळ, अमरावती शहर व मा. अनिताजी पाटील, एसपी नागरी हक्क संरक्षण विभाग अमरावती यांच्या उपस्थितीत व अमरावती सायकलिंग चे अध्यक्ष डॉक्टर चन्द्रशेखरजी कुलकर्णी या सर्वांतर्फे हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेला सुरुवात झाली. या नंतरच्या स्पर्धेमध्ये वयो वर्ष गट 17 खालील मुलींचा सहभाग होता. त्यांच्याकरता 7 किलोमीटरची स्पर्धा होती. यात सुद्धा मुलींचा उत्साह हा वाखाणण्यासारखा होता. या स्पर्धेला उपस्थित सर्व गणमान्यांच्या हस्ते पुनश्च हिरवी गेंडी टाकून सुरुवात करण्यात आली. यानंतर सर्वात शेवटी सर्वात लहान वयोगट वय वर्ष 14 खाली मुली यांची फार मोठ्या संख्येने उपस्थिती या स्पर्धे करिता होती. त्यांचा उत्साह फारच वाखाणण्यासारखा होता. या स्पर्धकांसाठी 5 किलोमीटरची स्पर्धा आयोजित केली होती. या सर्व स्पर्धकांनी सुद्धा ही स्पर्धा फार सुंदर पणे पूर्ण केली. या स्पर्धेमध्ये 19 वर्षे वयोगटातील स्पर्धक तसेच वर्ष वयोगट 17 मधील प्रथम तीन क्रमांकाचे स्पर्धक व 14 वर्षांमधील प्रथम तीन क्रमांकाचे स्पर्धकांचे मेडल व पारितोषिक देऊन व सर्टिफिकेट देऊन त्यांचे सन्मान करण्यात आला. इतर सुद्धा सर्व सहभागी स्पर्धक यांनी ही स्पर्धा यशस्वी पणे पूर्ण केली. त्यांना सुद्धा उत्तेजनार्थ फिनिशर मेडल व सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन देऊन सन्मानित करण्यात आले. यावर सर्व स्पर्धकांसाठी स्पर्धा स्थळी उत्तम अशी व्यवस्था केल्या गेली होती. या सर्व स्पर्धकांचे पालक सुद्धा मोठ्या संख्येने त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित होते. स्पर्धा संपल्याबरोबरच यासर्व स्पर्धकांसाठी अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था तिथे केलेली होती. सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली जिद्द चिकाटी व कौशल्य उत्कृष्ट प्रदर्शन केले. अमरावती सायकलींग असोसिएशन तर्फे आयोजित अस्मिता वुमेन सायकलिंग जिल्हा लीग यशस्वी पणे संपन्न करण्याकरिता सर्व असोसिएशन चे सदस्य यांचा उत्स्पुर्थपणे सहकार्य प्राप्त झाले. सर्व सदस्यांना दिलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. अमरावती पोलिस तर्फे रस्त्यांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या स्पर्धेच्या लगतच्या स्कूल ची जागा उपलब्ध करून देण्यासाठी श्री किशोरजी गट्टाणी यांचे सहकार्य लाभले. मंच संचालन प्रविण खांडपासोले व निता कक्कड तसेच श्री लक्ष्मीकांत खंडागळे व एचव्हीपीएम ची टीम यांनी ऑफीशियल ची जबाबदारी सांभाळली.











