
अमरावती सायकलिंग असोसिएशन आणि इतर शासकीय व स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावतीमध्ये प्रथम भव्य जिल्हास्तरीय सायकल स्पर्धा दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6-30 वाजता गौरी इन ते कोंडेश्वर या एक्सप्रेस हायवे वर आयोजित करण्यात आली- ही स्पर्धा वेगवेगळ्या गटामध्ये म्हणजेच 14 वर्ष 17 वर्ष 19 वर्ष 25 वर्ष खालील मुले व मुलींसाठी आयोजित आहे- या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना प्रथम पुरस्कार 5000 रुपये द्वितीय पुरस्कार 3000 रुपये तृतीय पुरस्कार 2000 रुपये व प्रत्येक फिनिशरला मेडल देऊन व पहिल्या 30 स्पर्धकांना हेल्मेट देऊन सन्मानित करण्यात येईल- या स्पर्धेमध्ये नोंदणी करण्यास सोयीस्कर व्हावे या दृष्टीने अमरावती सायकलींग असोसिएशन तर्फे शहराच्या मध्यभागी कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. हे कार्यालय डॉ- बबन बेलसरे यांचे हॉस्पिटल मधील तळमजला येथे पंचशील टॉकीज जवळ आहे. या कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी डॉ- बबन बेलसरे यांच्या हस्ते पार पडले- याप्रसंगी अमरावती सायकलींग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कुलकर्णी] उपाध्यक्ष संजय मेंडसे, सचिव अतुल कळमकर व कोषाध्यक्ष पियूष क्षीरसागर प्रकल्प निर्देशक लक्ष्मीकांत खंडागळे शहरातील गणमान्य व्यक्ती व सर्व सदस्य उपस्थित होते. अशी माहिती संघटनेचे जनसंपर्क अधिकारी श्री प्रवीण खांडपासोळे यांनी दिली.