अमरावती सायकलिंग असोसिएशनची संघटना अमरावती मध्ये नेहमीच सायकलिंगचे महत्त्व वाढविण्यासाठी व नागरिकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण व्हावी या हेतूने विविध उपक्रम राबवित असते. याच अनुषंगाने ही संघटना वर्षभर विविध सायकलिंग चॅलेंजचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर करत असते. या स्पर्धांना नेहमीच देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यावर्षी अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे पंढरपूर सायकल वारी चे आयोजन करण्यात आलेले होते. पंढरपूर येथे आयोजित चतुर्थ अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी व सम्मेलन २०२५ मध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील विविध गावातून ५००० सायकल स्वार सहभागी झाले होते. अमरावती सायकल असोसिएशनचे ३८ सायकलस्वार ज्यामध्ये ५ महिला सायकलस्वार व ४ सहकारी सदस्य यांनी हि वारी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या सायकल वारीचा शुभारंभ १८ जूनला सकाळी ६.०० वाजता एकविरा देवी मंदिरचे प्रांगण येथून झाला होता. हि सायकलवारी १८ जून ते २२ जून या दिवसामध्ये ५५० कीमी अंतर पूर्ण करून पंढरपूरला सुखरूप, कोणालाही काही त्रास न होता पोहचली.
रविवार दि. २२ जून २०२५ रोजी पंढरपूर येथे आयोजित चतुर्थ अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी व सम्मेलन २०२५ व सायकल रिंगण सोहळा मध्ये ५००० सायकलस्वारांनी अभूतपूर्व सहभाग नोंदविला. केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थिती मध्ये सकाळी सहाला सायकलपटूंच्या नगरप्रदशीणेला सुरुवात झाली. नगरप्रदक्षिणेनंतर सायकल रिंगण सोहळा झाला. नागपुरचे डॉ. अमित समर्थ हे वारीला उपस्थित होते. सायकलवारी व सम्मेलनात अमरावती सायकलिंग असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी व अमरावती सायकल वारकरी यांचे प्रतिनिधी राजेंद्र महाजन यांचा आयोजकाद्वारे सत्कार करण्यात आला. यावर्षीचे यजमान पद लातूर सायकलिंग असोसिएशन यांच्याकडे होते. या वारीत खालील सदस्य सहभागी झाले होते. लक्ष्मीकांत खंडागळे, नितिन अंबारे, नितिन बोरगावकर, राजेंद्र महाजन, शालिनी महाजन, रामरावजी उईके, नरेंद्र भटकर, राजू धोटे, विनोद निशितकर, सचिन जयस्वाल, किशोर शिरभाते, नरेंद्र कुरळकर, अतुल कळमकर, डॉ. देवेंद्र चौधरी, वर्षा सदार, शालिनी सेवानि, विनोद वानखडे, दिव्या मेश्राम, धनराज मेश्राम, विक्रांत खेरडे, पवनकुमार रामावत, प्रविण कोहळे, सृजल कोहळे, देवानन्द हिरकणे, जयमाला देशमुख, विजय महल्ले, केशव निकम, संतोष सरोदे, विजय गुडधे, सुभाष गुप्ता, रुषीकेश इंगोले, हर्ष भारुका, श्रीराम देशपांडे, महेश गट्टाणी, दिनेश नरसू, सचिन काळे, वैभव दलाल. सहकारी सदस्य राजूभाऊ देशमुख, विकास केमदेव, आशीष बोरकर, महेंद्र जडे हे होते. तसेच अमरावती येथून डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, प्रविण जयस्वाल, डॉ. सुरिता डफळे, राजु देशमुख, रिटा नरसू व रेवती देशपांडे यांनी पंढरपूर सम्मेलनामध्ये प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली.