अमरावती सायकलिंग असोसिएशन द्वारा आज दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ अमित समर्थ यांचे मार्गदर्शन सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.अमरावती सायकलिंग असोसिएशन चे उपाध्यक्ष संजय मेंडसे यांनी या कार्यकमाचे अध्यक्षपद भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजयजी पवार उपायुक्त सामान्य प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती प्रमुख वक्ते म्हणून डॉ अमित समर्थ आनि रविन्द्र परांजपे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेच्या पुजनाने अणि दीप प्रज्वलित करून झाली. सर्व पाहुण्यांचे आणी उपस्थितांचे स्वागत अँड सुषमा जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड कौस्तुभ लवाटे यांनी केली.
त्यानंतर संजय पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ अमित समर्थ यानी Race across India ह्या अंतर्गत श्रीनगर ते कन्याकुमारी सायकलिंग स्पर्धेबद्दल माहिती दिली. त्यानंतर जे सायकल स्वार ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्यांनी आपले अनुभव उपस्थितांना कथन केले. त्यानंतर विवेक कडू अणि धीरज कलसाईत यांनी सायकलिंग मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा ही डॉ अमित समर्थ यांनी सत्कार केला तसेच अमरावती सायकलिंग असोसिएशन चे नियमितपणे सायकलिंग करणारे सदस्य शालिनी सेवानी, राजाभाऊ महाजन, नितीन अंबारे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ अमित समर्थ आणी त्यांचे सहकारी रविन्द्र परांजपे यांनी उपस्थितांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. उपस्थितांचे प्रश्नाची मांडणी डॉ सागर धानोरकर यांनी अतिशय सोप्या भाषेत प्रमुख पाहुण्यांच्या समोर केली. डॉ सुरीता डफळे मॅडम यांनी 15 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या सायकलिंग चॅलेन्ज बद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ अमित समर्थ यांनी स्पर्धेबद्दल प्रश्नमंजुषा सुद्धा आयोजित केली अचूक उत्तर देणार्या व्यक्तीला बक्षीस देण्यात आले. ऑगस्ट महिन्यात आयोजित हिमालयीन मनाली – लेह ते खारडूंगला सायकल टूर अंतर्गत सायकलपटूंनी कशी तयारी करावी ह्या बाबतीत श्री महेश गट्टानी यांनी प्रश्न उपस्थित केले व त्याचे उत्तराच्या माध्यमातून सर्व सायकलपटूंना श्री अमित समर्थ यांनी मार्गदर्शन केले ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता कक्कड यांनी केले आणी आभार प्रदर्शन प्रविण खांडपासोळे यानी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
