अमरावती सायकलींग असोसिएशन दिशा संस्था तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित डिग्री कॉलेजऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रथम भव्य विदर्भस्तरीय सायकल स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये वयानुसार पाच गटांमध्ये स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते.
बारा वर्षाखालील जवळपास 209 मुलांनी सहभाग घेतला. पंधरा वर्षाखालील 95 मुले अठरा वर्षाखालील 32 21 वर्षाखालील एकोणवीस बावीस वर्षावरील 31 अशा एकूण 400 पेक्षा जास्त लोकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये द्वितीय पारितोषिक 3000 रुपये व तृतीय पारितोषिक 2000 रूपये व प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या सायकलपटूंना बाहेती ब्रदर्स कडून सायकल सुद्धा बक्षीस देण्यात आली. यामध्ये बडनेरा मतदार संघाचे आमदार श्री रवी राणा यांच्या निधी मधून पाच लाख रुपये मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा नियोजन अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला तसेच बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचे सुधीर वाकोडे ,हिरो सायकलचे अधिकृत विक्रेता बाहेती ब्रदर्स यांनी व घरकुल मसाले यांचे अरुणजी वरणगावकर यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य केले या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विभागीय आयुक्तालय अमरावती येथील उपायुक्त श्री संजयजी पवार उपायुक्त, सामान्य प्रशासन, पोलीस उपायुक्त सागर पाटील अमरावती शहर, निवासी जिल्हाधिकारी आशिष बिजवाल , अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी उपाध्यक्ष संजय मेंडसे व माजी आमदार जगदीश भाऊ गुप्ता, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके ही मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणा प्रसंगी अमरावती जिल्ह्याच्या माननीय खासदार सौ नवनीतजी राणा ह्या उपस्थित होत्या. त्यांनी सहभागी मुलांची संवाद साधला व सर्व विजेत्यांना बक्षिसाचे वितरण केले.
याप्रसंगी बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचे सुधीर वाकोडे, हिरो सायकलचे स्वप्निल, बाहेती ब्रदर्स चे संचालक ललित बाहेती, घरकुल मसालेचे संचालक तुषार वरणगावकर सलुजा फर्निचर चे संचालक सिट्टू भाई सलुजा हे उपस्थित होते. या स्पर्धेदरम्यान अनेक मान्यवरांनी या स्पर्धेत स्थळी भेटी देऊन मुलांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. ज्यामध्ये डॉक्टर बबन बेलसरे , उपजिल्हाधिकारी आशिष बिज्वल, नियोजन अधिकारी अभिजीत मस्के उपस्थित होते.
मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस व इतर शासकीय विभागाचे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते . मुलांच्या वेळेवर उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक समस्येच्या उपाय योजनेसाठी व प्रथमोपचारासाठी रीम्स हॉस्पिटल, पीडीएमसी व सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या ४ ॲम्बुलन्स व डॉक्टरची चमू सुद्धा उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये बारा वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम अंशुमन ठाकरे, द्वितीय मोहित गिरी, तृतीय श्री टोले, हे विजेते ठरले.
पंधरा वर्षाखालील वयोगटांमध्ये श्रीयांश राऊत, सुविर संपत, श्लोक पांडे विजेते ठरले.
18 वर्षाखालील मुलांमध्ये मिथुन जाधव, प्रेम मोहकार, विनम्र काळे विजेते ठरले.
21 वर्षा खालील गटामध्ये रितेश धोटे, विशाल जाधव, विकी राऊत विजेते ठरले आणि २२ वर्षावरील गटांमध्ये राजेश जाधव, आशिष बोरकर, प्रदीप चव्हाण हे अनुक्रमे विजेते ठरले
तसेच मुलींमध्ये १२ वर्षाखालील मुलींमध्ये प्रियल पिसावर, याशिका नागपुरे, स्वरा तायडे विजेते ठरले.
१५ वर्षाखालील मुलींमध्ये रुचिका वासनिक, पूर्णा पंचारिया,आराध्या लाऊडकर, ओवी पांडे विजेते ठरले.
18 वर्षाखाली श्रद्धा रांमावत, आदिती श्रीरामे व मानसी कोरगटे विजेते ठरले.
21 वर्षे वयोगटाखाली वैष्णवी सोनवणे, खुशी लड्डा विजेते ठरले.
२२ वर्षांवरील वयोगटांमध्ये संयुजा, कीर्ती बर्डिया, शालिनी सेवांनी इत्यादी अनुक्रमे विजेते ठरले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. सिपना कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ची टेक्निकल टीम होती , तसेच अमरावती सायकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी लक्ष्मीकांत खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले.
रेस ॲाफीशियल्स नितीन वानखडे , अतुल पाटील , मंगेश व्यवहारे, राजा नवाथे, अमले सर, पुष्पक खोंडे, तसेच अतुल कळमकर, देवानंद भोजे, राजूभाऊ देशमुख सुनिल पाठक , विनोद भटकर, राजु धोटे,पियुष क्षीरसागर, प्रवीण जयस्वाल, रणजीत घारफळकर , संदीप बागडे महिलांमध्ये सुषमा जोशी सोनी मोटवानी कीर्ती बर्डीया डॉ सुरिता डफले , कविता धुर्वे , अभिजीत साखरकर,सचिन पारेख इत्यादी मंडळींनी पथक प्रशिक्षण घेतले मंच संचलन सौ नीता कक्कड व प्रविण खांडपासोळे तसेच आभार सचिव अतुल कळमकर यांनी केले. हा कार्यक्रम नॅशनल हायवे ॲाथॅारोटी तसेच अमरावती शहर पोलीस यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.
