अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे रंगोत्सव 2023 हा 1 मार्च ते 31 मार्च 2023 अशी 31 दिवसीय चॅलेंज घेण्यात आले. या स्पर्धेमध्ये 1000, 750, 500 किलोमीटर एवढे अंतर सायकलिस्टला निर्धारित दिवसात पूर्ण करून त्यानुसार अनुक्रमे सुवर्ण, रजत व कांस्यपदक प्राप्त करायचे होते. या चॅलेंज मध्ये अमरावतीतूनच नव्हे तर वर्धा, पुणे, नागपूर, सेवाग्राम, चंदिगड, हिंगोली, फरिदकोट, चेन्नई, मुंबई गांधीनगर, धुळे, बेंगलोर तसेच वरुड, दर्यापूर, येथून देखील स्पर्धकांनी भाग घेतला व त्यामध्ये यश प्राप्त केले.
सदर स्पर्धेमध्ये मोस्ट कन्सिस्टंट रायडर इन मेल अँड फिमेल कॅटेगरी हा एक विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमरावती येथील श्री दीपक लड्डा तर सेवाग्राम येथील श्रीमती अनुपमा गुप्ता यांना या मोस्ट कन्सिस्टंट रायडर या कॅटेगरीमध्ये हा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे ज्या स्पर्धकांनी निर्धारित दिवसांमध्ये निर्धारित किलोमीटर पूर्ण केले त्यांना त्यांच्या कामगिरी नुसार सुवर्ण रौप्य आणि कास्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार सोहळ्या मध्ये अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सी एन कुलकर्णी, प्रमुख पाहुणे संजय पवार साहेब उपायुक्त विभागिय आयुक्तालय अमरावती, तसेच श्री विक्रम साळी डीसीपी अमरावती शहर त्याचबरोबर सिपना कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य श्री खेरडे सर आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता डॉक्टर अमित समर्थ यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माननीय श्री जगदीश भाऊ गुप्ता व मुरली टोयाटो चे श्री श्याम कलंत्री हे देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावती सायकलिंग असोसिएशनचे सचिव श्री अतुल कळमकर यांनी केले. रंगोत्सव 2023 पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख आकर्षण अल्ट्रासायलिस्ट डॉ.अमित समर्थ होते. ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी नागपूरहून सायकलिंग करत अमरावतीला पोहोचले होते. त्यांचा परिचय एडवोकेट कौस्तुभ लवाटे यांनी केला. डॉ. अमित समर्थ यांनी त्त्यांच्या टॉक शो मध्ये सायकलिस्ट चा आहार कधी कसा कोणता असावा, सायकलिंग करताना काय खायचे? पाणी कसे ,केव्हा ,किती प्यायचे ? तसेच शारीरिक व्यायाम, मोठ्या लांब पल्ल्याच्या स्पर्धांसाठी फिटनेस ट्रेनिंग कसे आवश्यक आहे, त्याचबरोबर बॉडी रिकव्हरीसाठी विश्रांती पण किती गरजेची आहे हे अत्यंत सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि उपस्थित सायकलपटूंशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ह्या रंगोत्सव 2023 च्या पदक वितरण सोहळ्यानंतर नुकत्याच कश्मीरी टू कन्याकुमारी या 3651 किलोमीटर असा खडतर चॅलेंज पूर्ण करणाऱ्या अमरावतीच्या विजय धुर्वे, देवानंद भोजे टीमचा , तसेच संतोष काकडे आशिष बोरकर, केशव निकम, कृष्णा मोहोकार यांच्या टीम ॲाफ फोर यांचा सन्मान अमरावती सायकलींग असोसिएशन तर्फे करण्यात आला. सदर कार्यक्रमाला अमरावती सायकलिंग असोसिएशनचे सदस्य तसेच वरुड, नागपूर, वर्धा, इथून आलेले सायकल प्रेमी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचलन एडवोकेट सौ.सुषमा जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना दुधे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरता श्री संतोष काकडे, श्री संजय मेंडसे, श्री विजय गुल्हाने, श्री पियुष क्षिरसागर, श्री प्रवीण जयस्वाल, श्री ऋषिकेश इंगोले, श्री सुनील पाठक, सचिन पारेख, रितेश जैन, राजूभाऊ महाजन, अर्णव हिवराळे, कृष्णा आशिष बोरकर, शिवा बोरकर, सौ.कविता धुर्वे व इतर कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.