रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी अमरावती सायकलिंग असोसिएशनचे वतीने महिला सायकल रॅलीचे आयोजन


रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी अमरावती सायकलिंग असोसिएशनचे वतीने महिला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. शरीर स्वास्थम खलूमहे या शब्दपंक्तीकडे लक्ष वेधीत मानव प्रजातीला आरोग्य अबाधित राखण्यासाठी व दैनंदिन जीवनात तत्पर व तंदुरुस्त राहण्यासाठी नियमितपणे सायकलिंग केल्यास ही बाब आरोग्य अबाधित राखण्यासाठी महिला भगिनीकरिता मोलाची ठरू पाहत आहे. यासोबतच पर्यावरणाचा समतोल यथावत कायम राखण्यासाठी तसेच शारीरिक क्षमता व तंदुरुस्ती वृद्धिंगत होण्यासाठी नियमितपणे सायकलिंग करणे आवश्यक आहे. असा बहुमूल्य संदेश या सायकल रॅलीच्या निमित्ताने सर्व सायकलपटूंनी यावेळी शहरवासीयांना दिल्याचे चित्र यावेळी दिसून आले. यावेळी महिला सायकलपटूंना टी-शर्ट चे वितरण करण्यात आले.तदपूर्वी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्व सायकलपटूसोबत हितगुज करीत संवाद साधला. तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अमरावती सायकलिंग असोसिएशनचे वतीने आयोजित सायकल रॅली हा उपक्रम अभिनव -अनुकरणीय व प्रेरणादायी असल्याचे सांगित त्यांनी यावेळी उपस्थितांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.यावेळी ५० महिला सायकलपटूंनी या रॅली मध्ये सहभाग नोंदवला होता. जिल्हा स्टेडियम येथून या सायकल रॅलीला सुरुवात झाल्यानंतर हॉटेल गौरी इन -कठोरा-नांदुरा-गाडगे नगर-मार्गे सायकलिंग करीत सायकलपटूंनी जवळपास २५ किलोमीटरचा टप्प्या पार केल्यावर पंचवटी चौक मार्गे ही सायकल रॅली जिल्हा स्टेडियम येथे परतताच या रॅली चा समारोप झाला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, विधी मंडळ समन्वयक, प्रवक्ते-संजय खोडके,एच व्ही पी एम-सचिव डॉ. माधुरी चेंडके,-प्रा.डॉ. मोहना कुलकर्णी, अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष-डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, सचिव-अतुल कळमकर, कोषाध्यक्ष-पियुष क्षीरसागर,डॉ. सुरीता डफळे ,वैखरी कळमकर , संजय मेंडसे, लक्ष्मीकांत खंडागळे,प्रवीण जयस्वाल, राजू देशमुख, शशिकांत ठवळी,सागर धनोडकर,स्मिता मोरखडे,ऍड. सुषमा जोशी,अर्चना दुधे,मोनाली ढोले,मीनल देशमुख, राधा राजा,सोनी मोटवानी, कीर्ती बरडीया, कविता धुर्वे,विश्वजा वानखेडे, शालिनी सेवानी, राधा सावदेकर, वैशाली ठाकरे,मिथिलेश राठोरे, नबोनिता कक्कड,रजनी गिरी,संगीता ठाकरे, अर्चना मांगे, कमलेश, अंजली देशमुख, अल्का जोशी,शालिनी महाजन,डॉ. जागृती शाह,डॉ. संगीता कडू,रेखा केवलरामानी,डॉ. नीता व्यवहारे,शुभदा दिवाण,साधना मेहता, गीता वंजारी,रेश्मा खत्री, अनिषा खत्री, सोनाली लेंडे, रिया तिडके,हेमा धोपाडे, शुभांगी चव्हाण, मेघा कराळे, श्रद्धा नांदूरकर,अंजली झोड,वर्षा राजूरकर, मोनिका केडीया,आदीसहित अमरावती सायकलिंग असोसिएशनचे सर्व सदस्य, पदाधिकारी, आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.