अमरावती सायकल असोसिएशनचे सदस्य व ख्यातनाम फोटोग्राफर श्री शशी ठवळी यांनी दिनांक 15/ 12/ 2022 रोजी नर्मदा परिक्रमा सायकल ने आरंभ केली. त्यांनी जवळपास 3000 किमी चा प्रवास एकट्याने कधी कच्चा तर कधी जंगलातून जाणाऱ्या मार्गाने पूर्ण केला. व संपूर्ण परिक्रमा दरम्यानचे सगळे दिवस आश्रमिय पद्धतीने काढले,
आणि विशेष म्हणजे त्यांनी या दिवसात आदर, सेवाभाव काय असतो हे फार जवळून अनुभवले हा अनुभव त्यांना सैदव आयुष्यात कामी येईल. आज संध्याकाळी 4.30 त्यांचे अमरावती मध्ये आगमन झाले असता अमरावती सायकलींग असोसिएशन तर्फे त्यांचे वेलकम पॉइंट येथे भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी व सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी केलेल्या या अतुलनीय कार्यासाठी अभिनंदन करण्यात आले, व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.