अमरावती सायकलिंग असोसिएशन, दिशा संस्था, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावतीमध्ये प्रथमच भव्य जिल्हास्तरीय सायकल स्पर्धा आज दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी पार पडल्या. या स्पर्धांमध्ये वय वर्षे 14,17, 19 आणि 25 वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक मोहक घाटोळ, द्वितीय क्रमांक परम खोरगडे व तृतीय क्रमांक श्लोक पांडे यांनी पटकाविला आहे व मुलींमध्ये प्रथम क्रमांक पूर्णा पांचारिया, द्वितीय क्रमांक रुचिका वासनिक आणि तृतीय क्रमांक प्रिया पिसारवार यांनी पटकाविला आहे.
17 वर्षे वयोगटाखाली स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुरज कुंटेरे, द्वितीय क्रमांक विनम्र काळे आणि तृतीय क्रमांक रोशन गवई याने पटकाविला आहे .तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक वैदेही वानखेडे, द्वितीय क्रमांक श्रद्धा रामावत आणि तृतीय क्रमांक प्राची इंगळे हिने पटकाविला आहे.
25 वर्षे वयोगटाखालील स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक मिथुन जाधव, द्वितीय क्रमांक राजेश जाधव आणि तृतीय क्रमांक आशिष बोरकर यांनी पटकविला आहे तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक सृष्टी गुप्ता, द्वितीय क्रमांक वैष्णवी सोनवणे हिने पटकाविला आहे.
तसेच 19 वर्षे वयोगटाखालील स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक अजय एखंडे, द्वितीय क्रमांक राज भिलावेकर आणि तृतीय क्रमांक प्रेम मोहकर यांनी प्राप्त केला आहे. तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक सृष्टी शिवनीकर, द्वितीय क्रमांक आर्या साखरकर व तृतीय क्रमांक अणू भुयार हिने प्राप्त केला आहे . स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना प्रथम पुरस्कार रोख 5000/- रुपये; द्वितीय पुरस्कार 3000/- रुपये; तृतीय पुरस्कार 2000/- रुपये; आणि ट्रॉफी व स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल व हेल्मेट देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी पोलीस उपायुक्त विक्रम साळी,संजय पवार उपायुक्त सामान्य प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती, सूर्यकांत जगदाळे उपपोलीस अधीक्षक, नितीन व्यवहारे उपविभागीय अधिकारी, आशिष बिजवल उपजिल्हाधिकारी, विवेक काळकर उपजिल्हाधिकारी, संतोष काकडे तहसीलदार व अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर कुलकर्णी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला डॉ. अनिल बोंडे, जगदीश गुप्ता यांनी सुद्धा या स्पर्धेच्या स्थळी सदिच्छा भेट दिली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके, सिपना कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉक्टर खेरडे,अनिल जी अग्रवाल व त्यांचे कुटुंबीय,ललित बाहेती, बल्लू पडोळे, दिलीपभाई पोपट, उदय मांजरे, संतोष काकडे. आणि शासकीय, सामाजिक शैक्षणिक, तसेच क्रीडा क्षेत्रातील अनेक सन्माननीय व्यक्ती उपस्थित होत्या.
स्पर्धेचे भव्य स्वरूप बघता स्पर्धकांची कुठलीही गैरसोय होऊ नये; ह्यासाठी सर्वतोपरी काळजी आयोजकांकडून घेण्यात आली होती. तसेच पुरेशी सुरक्षा व वैद्यकीय व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सर्व शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन सचिव लक्ष्मीकांत खंडागळे, सचिव अतुल कळमकर, उपाध्यक्ष संजय मेंडसे कोषाध्यक्ष पियूष क्षीरसागर व अमरावती सायकलिंग असोसिएशनचे सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.
![](https://cyclingaca.com/wp-content/uploads/2023/01/201A0100.jpg)