अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी ॲाडेक्स् इंडीया रॅन्डोनिएरींग च्या अंतर्गत BRM 400 किमी राईडचे आयोजन केले गेले. या मध्ये अमरावती व्यतिरिक्त बुलढाणा, खामगाव, पांढरकवडा, परभणी जिल्हयातील एकूण 16 रायडर सहभागी झाले होते. ही 400 किमी राईड 27 तासाच्या आत पूर्ण करायची होती. अमरावती सायकलींग असोसिएशन सदस्य श्री संजय मेंडसे आणि श्री राजेन्द्र महाजन यांनी रविवार 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.00 वाजता या राईड ला झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी संघटनेचे सचिव अतुल कळमकर सदस्य सचिन पारेख, विनोदसिंग चौहान, गजेंद्र सदार, प्रशांत अघाव, सुभाष गुप्ता, अंजली झोड, राजूभाऊ देशमुख, जयमाला देशमुख, सोनी मोटवानी, इत्यादी सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. ही राईट जिल्हा स्टेडीयम येथे आरंभ होऊन तिवसा, वाडी, नागपुर ते रामटेक येथून यु टर्न घेऊन पुन्हा त्याच मार्गे जिल्हा स्टेडीयम वर याची सांगता करण्यात आली.
या राईडसाठी प्रमुख राईड रिस्पॉन्सिबल म्हणून अमरावती सायकलींग असोसिएशनचे कोषाध्यक्ष पियुष क्षीरसागर यांनी विजय महल्ले यांच्या सहकार्याने महत्वाची जबाबदारी पार पाडली. या राईडच्या यशस्वीतेसाठी अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या इतर सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. या BRM 400 km राईड मध्ये किशोर शिरभाते, राजेंद्र महाजन, सचिन चौधरी, पियुष डेकाटे, भरत मालानी, वर्षा सदार, महेश गट्टाणी, समीर बागडे, अजीज सौदागर, सहदेव कोंकटवार, विनोद बलांसे, आशिष गावंडे, राजू धोटे, नरेंद्र भटकर, पवनकुमार रामावत, अजय बोले, असे 16 रायडर सहभागी झाले होते. यामध्ये 1 महिला राईडरचा सुद्धा सहभाग होता. विशेष बाब म्हणजे 16 रायडर पैकी 14 राईडर्सनी हि राईड ऊन, चढ, थंडी व प्रचंड वाहतुकीचा अडथडा यावर मात करीत अशी आव्हानात्मक 400 KM राईड निर्धारित वेळेमध्ये पूर्ण केली.
त्यांचे अमरावती सायकलिंग असोशिअशन तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी अतुल कळमकर, श्रीराम देशपांडे, गजेंद्र सदार, सचिन पारेख, संजय मेंडसे, राजुभाऊ देशमुख, विनोद निशीतकर, सृजल कोहळे, सोनी मोटवानि, शालिनी सेवानी, अमिता देशपांडे व हे जिल्हा स्टेडीयम येथे उपस्थित होते.






