अमरावती सायकलींग असोसिएशनचे ३ सायकलवीरांनी 4250 किमी कश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहीम अवघ्या १६ दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केली…

भारत सरकारच्या फिट इंडिया उपकमा अंतर्गत श्री सरदार वल्लभाभाई पटेल यांच्या 150 वी जयंती निमित्त आयोजित कश्मीर टू कन्याकुमारी या साइकिल रैली मधे अमरावतीतील तीन सायकलपटू श्री नितिनजी अंबारे, मेजर श्री विनोदजी वानखडे व श्री मोहनजी कावरे यांचा समावेश झाला. संपूर्ण भारतातून 150 सायकलपटूंची या मोहिमेसाठी निवड केल्या गेली होती यात विशेष म्हणजे अमरावती साइकलिंग एसोसिएशन चे तीन साइकिलिस्ट यामध्ये निवडल्या गेले होते. सदर अभियान है कश्मीर येथून 31 ऑक्टोबर ला सुरू झाले. संपूर्ण प्रवास हा ठंडी पाउस ऊन चढ उतार असा होता. दिल्ली होत जयपुर मार्गे सर्व राईडर वडोदरा येथे पोहचले. सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक (स्टेचू ऑफ़ यूनिटी) चे दर्शन करून संपूर्ण 150 राइडर है कन्याकुमारी येथे 16 दिवसाचा 4250 किमीचा प्रवास यशस्वीपणे पुणे केला. संपूर्ण मार्गानी सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारतासाठी केलेल्या महान कार्याची माहिती गावोगावी देत प्रवास झाला. अमरावती राइडर्स नी रोज 200, 250 तर कधी 300 किलोमीटर अशी रोज सायकलिंग करत हा प्रवास पूर्ण केला.  हे राइडेर्स सकाळी ६ ते रात्री १० ते ११ पर्यन्त सायकलिंग करायचे.  अशा या साहसी सायकलिस्ट चे अमरावती मध्ये हार, फटाखे, ढोल ताशे च्या गजरात भव्य स्वागत केल्या गेले. मा. पोलिस उपायुक्त श्री रमेशजी धुमाळ यांनी सर्व सायकलिस्ट चे गाडगे नगर पोलिस येथे स्वागत केले. या स्वागत रॅली मध्ये अमरावती साइकलिंग संगठनचे सचिव अतुल कळमकर उपाध्यक्ष संजय मेंडसे कोषाध्यक्ष पियुष क्षीरसागर सदस्य राजू देशमुख, प्रविण जयस्वाल, सचिन पारेख, केशव निकम, महेश गट्टानी, श्रीराम देशपांडे, किशोर शिरभाते, अभिजीत साखरकर, राजू महाजन, दिनेश नरसू, धनराज मेश्राम, दिव्या मेश्राम, नारायण अंबारे, कलावती अंबारे, विजय अंबारे, कल्पना अंबारे, संजय अंबारे, कविता अंबारे, भारत अंबारे, मेघा अंबारे, जी बी देशमुख एन पी फाटकर श्री गांजरे श्री राजपूत श्री काकडे श्री  गुडधे जीएसटीचे ऑफिसर कॉलनी मधील श्री महाजन, महाजन ताई  श्री टवलारे वैजयंती टवलारे तसेच सेंट्रल जीएसटी चे कर्मचारी अधिकारी नाशिकचे रायडर गोविंदभाऊ वानखडे, प्रमोद वानखडे, प्रकाश गवई, पुरुषोत्तम मोरे, मीनाक्षी कावरे, अनुराधा कावरे, अंजली कावरे, धीरज कावरे, शशिकांत मानकर, प्रदीपराव गवळीकर, जयश्री गवळीकर व बरेच नागरिक उपस्थित होते