ACA विंटर वॉरियर सायकलिंग चॅलेंज पदक वितरण समारोह संपन्न

अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे विंटर वॉरियर आभासी सायकलिंग चॅलेंज  1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 या कालावधी करिता आयोजित केले होते. यामध्ये ॲक्टिव राईडसाठी किमान 20 किलोमीटर सायकलिंग करणे बंधनकारक होते. यामध्ये ब्रांझ मेडल मिळविण्याकरिता 500 किलोमीटर व 20 दिवस ऍक्टिव्ह तसेच सिल्वर मेडल करता 750 किलोमीटर व 20 दिवस ॲक्टिव्ह आणि गोल्ड मेडल करिता 900 किलोमीटर व 25 दिवस ऍक्टिव्ह राईड ची आवश्यकता होती. या स्पर्धेमध्ये 31 दिवस ऍक्टिव्ह राईड करणाऱ्या स्पर्धकास कन्सिस्टंट ट्रॉफी तसेच डिसेंबर महिन्यातील पाच रविवार पैकी कोणत्याही चार रविवारी दोन राईड 100 किलोमीटर च्या व 2 राईड 75 किलोमीटर, अशा चार स्पेशल राईड करणाऱ्या स्पर्धकास स्पेशल ट्रॉफी ने सन्मानित करण्यात आले.

              या चॅलेंज मध्ये एकूण 218 स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये अमरावती येथील 98 तर 120 स्पर्धक संपूर्ण भारतातून सहभागी झाले होते. महिला स्पर्धक 25 व पुरुष स्पर्धक 193 होती. या स्पर्धेमध्ये एकूण 175 स्पर्धकांनी आपले लक्ष गाठले व मेडल प्राप्त केले आहे. तसेच 104 स्पर्धकांनी विशेष कामगिरी करून ट्रॉफी मिळवली आहे.

या कार्यक्रमाला अमरावती सायकलिंग असोसिएशन चे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कुलकर्णी,  उपाध्यक्ष संजय मेडसे,  सचिव अतुल कळमकर, प्रकल्प प्रमुख सचिन पारेख,  प्रमुख पाहुणे डॉ. अतूल तायडे, वर्धा व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यामध्ये संडे फंडे राईड मधील रोटेटिंग ट्रॉफी विजेते श्री विनोद वानखडे अणि महिला स्पर्धक रिना काळे यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यकमामध्ये अमरावती सायकलिंग असोसिएशनचे मार्च महिन्यामध्ये येणारे रंगोत्सव हे मासिक सायकलिंग चॅलेंज ची घोषणा प्रकल्पप्रमुख संजय मेंडसे यांनी केली व या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता मो. नं. 9420189148 वर संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.

या विंटर वॉरियर सायकलिंग चॅलेंज ला यशस्वी करण्यासाठी रितेश जैन तीताजी यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच डेटा कीपींग टीम मध्ये श्री सी. एन. कुलकर्णी सर, सुरिता डफळे मॅडम, प्रशांत अघाव, विश्वजा वानखडे, वीरेंद्र तरते, सागर धनोडकर व सचिन पारेख यांनी सहकार्य केले. त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. या कार्यकमला अमरावती व वर्धा येथून भरपूर सायकल पटू उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पारेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण जयस्वाल,  लक्ष्मीकांत खंडागळे,  पियुष क्षीरसागर,  राजूभाऊ देशमुख, ऋषीकेश इंगोले यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रविण खांडपासोले, वैशाली सरागे  आणि आभार प्रदर्शन  सचिव  अतुल कळमकर यांनी केले.