BRM 600 किमी प्रतियोगिता पुर्ण करून 5 सायकलिस्टनी मिळविली सुपर रेंडोंनीअर ही पदवी.

अमरावती सायकलींग असोसिएशनची यशाची परंपरा कायम, BRM 600 किमी प्रतियोगिता पुर्ण करून
5 सायकलिस्टनी मिळविली सुपर रेंडोंनीअर ही पदवी.
अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे कॅलेंडर वर्ष नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 ची शनिवार दिनांक 3 फेब्रूवारी 2024 रोजी सकाळी 6.00 वाजता रेंडोनिअर सिरीजमधील BRM 600 किमी अमरावती-जळगाव-अमरावती राईड आयोजित करण्यात आली. या सिरीजमध्ये अतुल कळमकर, राजेंद्र महाजन, राजू धोटे, नितीन अंबारे, विजय महल्ले, वीरेंद्र तर्ते, सर्व अमरावती तसेच अशोक राम राणा, जबलपूर आणि अजीज सौदागर, भोपाळ असे एकूण 8 रायडर सहभागी झाले आहे. 600 किमी राईड 40 तासाच्या आत पूर्ण करायची होती. रॅलीची सुरुवात जिल्हा स्टेडियम अमरावती येथून सकाळी 6 वाजता श्री. संतोष काकडे तहसिलदार व डॉ. अतुल कढाणे यांनी झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. ही साहसी राईड अमरावती येथे सुरू होऊन जळगाव व परत त्याच मार्गे अमरावती असा मार्ग निश्चित केला होता.
सदर राइड अतुल कळमकर, राजेंद्र महाजन, राजू धोटे, नितीन अंबारे, विजय महल्ले, वीरेंद्र तर्ते, सर्व अमरावती तसेच अशोक राम राणा, जबलपूर यांनी 40 तास या निर्धारित वेळेच्या आत पुर्ण केली. राजू धोटे व राजुभाऊ महाजन यांनी 200, 300, 400 व 600 ही सिरिज दुसऱ्यांदा पुर्ण करून दुसर्यां दा SR पद प्राप्त केले आहेत. तसेच नितिन अंबारे, विजय महल्ले, वीरेंद्र तर्ते यांनी आपले पहिले SR पद प्राप्त केले.
राईडचे समापन जिल्हा स्टेडियम येथे ठेवण्यात आले होते. या राईडसाठी प्रमुख राईड रिस्पॉन्सिबल म्हणून श्री पियूष क्षीरसागर व विनोद वानखडे ह्यांनी ही जबाबदारी अतिशय कुशलतेने पार पाडली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरावती सायकलिंग असोसिएशन च्या इतर सर्व सदस्यांनी नियोजन केले आहे. संजय मेंडसे, देवानंद भोजे, सचिन पारेख, विनोदसिंग चौहान, राजू देशमुख, प्रविण खांडपासोळे, ज्योति खांडपासोळे, प्रविण जयस्वाल, रितेश जैन ऋतुराज, बकुल कक्कड, महेश गट्टानी, प्रवीण काळे, विजय धूर्वे, श्रीरामदेशपांडे नरेंद्र भटकर, संदीप हटकर, प्रशांत सोनटक्के, कविता धुर्वे, शालीनी महाजन, शालिनी सेवानी, वैशाली सरागे हे स्वयंसेवक राइडर्सचे स्वागत व उत्साह वाढविण्याकरिता उपस्थित होते. ह्या सर्व रायडरचे अमरावती सायकलिंग असोशिअशन तर्फे ढोलताशयाच्या गजरात स्वागत करून व केक कटींग करून अभिनंदन करण्यात आले.