अमरावती सायकलिंग असोसिएशन ही सायकल प्रेमींची नोंदणीकृत संघटना असून नियमित विविध स्पर्धांचे आयोजन करीत असतात.ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रसंग आणि वातावरणाला अनुसरून रॅली आणि सायकलिंग मधले वेगवेगळे चॅलेंजेस आयोजित करत असतात . नुकतेच पार पडलेले Ride With Rain-23 या चॅलेंज चे बक्षीस वितरण सोहळा सिपना कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे संपन्न झाला आहे. या चॅलेंजमध्ये एकूण 272 स्पर्धकांनी भाग घेतला होता, ज्यामध्ये जवळपास दोनशे स्पर्धक हे बक्षीसाचे मानकरी ठरलेले आहे. त्यामधील सहा कन्सिस्टंट रायडर ची निवड करण्यात आली ज्यामध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या भव्य बक्षीस वितरण सोहळ्याला नाशिकचे डॉ. आबा पाटील , अध्यक्ष रॉयल रायडर ग्रुप नाशिक हे उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांचे सहकारी राजाभाऊ कोटमे हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले होते. आबा पाटील यांचा परिचय डॉक्टर सुनिता डफले यांनी करून दिला.आबा पाटील यांनी सायकल क्षेत्रातील तसेच ट्रेकिंग मधील त्यांचे अनुभव त्यांच्या प्रेरणादायी वाणीने कथन केला. तो प्रसंग सर्व उपस्थितांच्या अंगावर रोमांच आणणारा ठरला या अनुभव कथनामध्ये छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रपती संभाजी राजांच्या कर्तुत्वाची सुद्धा आठवण करून दिली आणि असे उपक्रम व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचे निर्भीड आणि तटस्थ व्यक्तिमत्व घडविण्यात कसे महत्त्वाचे आहे हे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले. या बक्षीस वितरण कार्यक्रमा प्रसंगी श्री संतोष काकडे सर, तहसीलदार . श्री सूर्यकांत जगदाळे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमरावती व अमरावती सायकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर कुलकर्णी उपस्थित होते.या कार्यक्रमाला अमरावती सायकलींग असोसिएशनचे सचिव अतुल कळमकर उपाध्यक्ष संजय मेंडसे कोषाध्यक्ष पियुष क्षीरसागर सहसचिव लक्ष्मीकांत खंडागळे सरिता डफले राजूभाऊ देशमुख ऋषिकेश इंगोले इत्यादी पदाधिकाऱी व सायकलिंग चॅलेन्ज मधे भाग घेतलेल्या अमरावती व बाहेरगावची क्रीडा प्रेमींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील पाठक सर, प्रास्ताविक श्री प्रवीण खांडपासोळे व आभार प्रदर्शन सलोनी पडवळकर यांनी केले.