अमरावती सायकलींग असोसिएशन तर्फे आयोजित 150 किमी बीपी राईड संपन्न

अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या माध्यमातून रविवार दिनांक 25 जून, 2023 रोजी सकाळी 6:00 वाजता 150 किमी चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अमरावती अकोला येथून एकूण 18 रायडर्स नी भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन अमरावतीचे पोलीस उपायुक्त श्री. सागर पाटील, लक्ष्मीकांत खंडागळे, डॉ. सुनिता डफळे  व डॉ. अंजली देशमुख यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून झाले. रॅलीची सुरुवात अमरावती जिल्हा स्टेडियम येथून करण्यात आली आणि चेक पॉइंट लेहगाव, बेनोडा शहीद, मोर्शी, डवरगाव व शेवटचा पॉईंट जिल्हा स्टेडियम येथे ठेवण्यात आला.  प्रमुख राईट रिस्पॉन्सिबल म्हणून पियुष क्षीरसागर यांनी नियोजन केले. अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे स्वयंसेवक अतुल कळमकर, संजय मेंडसे, लक्ष्मीकांत खंडागळे, सचिन पारेख, रितेश जैन, नेबोनिता कक्कड, शालिनी सेवांनी, राजेश सेवांनी, पंकज सरकटे व इतर सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
या 150 किमी राईड मध्ये विनोद शर्मा, संजय छाबडा, संतोष काकडे, विनीत हिंगणकर, आशिष बोरकर, दीपक लढ्ढा, प्रेम मोहोकार, प्रिया तिडके, विक्रम साळी, विजय धुर्वे, केशव निकम, वैशाली सरगे, प्रदीप चव्हाण, चेतन घोरपडे, अर्चना दुधे, सुमित बडे, विशाल जाधव व प्रितेश सुरंजे असे 18 रायडर्स ज्यामध्ये 3 महिला रायडर्सचा सुध्दा सहभाग होता व सर्वांनी 10:30 तासाच्या आत यशस्वीरित्या ही स्पर्धा पूर्ण केली.
अमरावती सायकलींग असोसिएशन तर्फे सर्व सायकलस्वारांना पदक देऊन अभिनंदन करण्यात आले  व स्वयंसेवकांचे आभार मानण्यात आले.