जागतिक सायकल दिवस निमित्त भव्य रॅली संपन्न

जागतिक सायकल दिवस निमित्त भव्य रॅली संपन्न

अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे आज जागतिक सायकलिंग दिवसाच्या निमित्ताने भव्य सायकल रॅलीचे आयोजन केले गेले. ही रॅली अमरावती क्रीडा संकुल येथून सकाळी सात वाजता आरंभ करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन अमरावती शहराचे पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी आणि  श्री संजय पवार उपायुक्त,    अमरावती विभागीय कार्यालय,  उपविभागीय पोलीस अधिकारी जगदाळे सर यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. या रॅलीमध्ये पोलीस आयुक्त, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि उपायुक्त महसूल यांनी स्वतः सहभाग घेतला आणि जागतिक सायकलिंग दिवसाच्या निमित्ताने सुदृढ आरोग्य निरोगी पर्यावरण आणि व्यायामाचे महत्त्व या विषयावर नागरिकांनी जागरूक राहावे याबद्दल आवाहन केले .
या कार्यक्रमा वेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. अमरावती सायकलींग असोसिएशन चे  उपाध्यक्ष श्री संजय मेंडसे सचिव श्री अतुल कळमकर आणि कार्यकारिणी सदस्य प्रवीण जयस्वाल यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी अमरावती सायकलींग असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. ही रॅली अमरावती क्रीडा संकुल येथून आरंभ होऊन इरविन चौक, मालवीय चौक, जयस्तंभ ,राजकमल ,रेल्वे स्टेशन, मालटेकडी मार्गे परत जिल्हा स्टेडियम येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.रॅली नंतर सर्व सहभागी सायकल स्वारांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. रॅली यशस्वीते करीता असोसिएशन च्या सर्व सदस्यांचे व शहरातील सर्व सायकलपटून चे मोलाचे सहकार्य लाभले. या भव्य रॅलीमध्ये लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीं सुद्धा सहभागी झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून सर्वांचे आभार मानण्यात आले.