400 BRM राईड यशस्वी रित्या संपन्न🙏

अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे कॅलेंडर वर्ष नोव्हेंबर 22 ते ऑक्टोबर 23 ची रविवार दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 5.00 वाजता रेंडोनिअर सिरीजमधील BRM 400 किमी राईडचे आयोजन केले गेले. या सिरीजमध्ये अमरावती, यवतमाळ आणि वाशीम जिल्हयातील एकूण 17 रायडर सहभागी झाले होते. 400 किमी राईड 27 तासाच्या आत पूर्ण करायची होती. लोणार ला जातांना संपूर्ण मार्गानी विरूद्ध हवेशी सामना करीत व रीसोड ते लोणार पूर्ण चढाईचा खडतर प्रवास सर्व रायडर्स नी लिलया पार केला. परत येतांना सुध्दा संपूर्ण रात्र थंडीत सुरक्षीत सायकल चालवत आपला प्रवास पूर्ण केला
डॉ. अभिजीत देशमुख आणि अमरावती सायकलिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री संजय मेंडसे यांनी ध्वज दाखवून या रॅलीचे उद्घाटन केले. यावेळी स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी अमरावती सायकलिंग असोसिएशन चे मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीची सुरुवात भक्तीधाम बडनेरा रोड अमरावती येथून करण्यात आली . ही राईड अमरावती येथे सुरू होऊन करंजा वाशिम रिसोड लोणार व परत त्याच मार्गे अमरावती असा मार्ग निश्चित केला होता. वाशीम मध्ये स्पर्धकांचे चेतन शर्मा यांचेत्तर्फे स्वागत करण्यात आले.
राईड चा फिनिश पॉईंट सुद्धा भक्तीधाम बडनेरा रोड अमरावती हाच होता.या राईड साठी प्रमुख राईड रिस्पॉन्सिबल म्हणून श्री प्रवीण खांडपासोळे यांनी श्री विनोद वानखडे व ऋषी इंगोले यांच्या सहकार्याने नियोजन केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरावती सायकलिंग असोसिएशन च्या इतर सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. या BRM 400 राईड मध्ये विनोदसिंग चव्हाण , दीपक चव्हाण, कीर्ती बर्डिया, लक्ष्मीकांत खंडागळे , दीपक लढा ललित बाहेती, शालिनी सेवानी,डॉक्टर अंजली देशमुख, सदानंद देशमुख, राजू धोटे , प्रशांत अगाव , अर्चना मांगे, विजय धुर्वे, राजुभाऊ महाजन, युसुफ शेख, आशिष बोरकर, अभिजीत राऊत. असे 17 रायडर सहभागी झाले होते. या 17 पैकी 4 महिलांचा सुध्दा सहभाग होता. विशेष बाब म्हणजे 17 रायडर पैकी 14 रायडर नी ही राईड निर्धारित वेळेत पूर्ण केली. त्यांचे अमरावती सायकलिंग असोशिअशन तर्फे अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यासाठी सचिन पारेख, देवानंद भोजे,अतुल कळमकर, अभिजीत साखरकर, पियूष क्षीरसागर, संजय मेंडसे, राजूभाऊ देशमुख ,रीतेश जैन, नरेंद्र भटकर, रामराव उईके, धरमजी मोटवाणी, इत्यादी लोक उपस्थित होते
आता ११ फ्रेब्रुवारी रोजी हे सर्व रायडर्स पुढला टप्पा ६०० करण्यासाठी सज्ज झाले आहेत. इतर रायडर्स सुध्दा या राईड मधे सहभागी होऊ शकतात ज्यांनी सहभाग घ्यायचा आहे त्यांनी पियुष क्षिरसागर 80877 53827 याचेशी संपर्क साधावा.