200 BRM राईड यशस्वी रित्या संपन्न

अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे कॅलेंडर वर्ष नोव्हेंबर 22 ते ऑक्टोबर 23 ची रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 5.30 वाजता रेंडोनिअर सिरीजमधील BRM 200 किमी राईडचे आयोजन केले गेले. या सिरीजमध्ये अमरावती आणि जळगाव जिल्हयातील एकूण 14 रायडर सहभागी झाले होते. 200 किमी राईड 13 तासाच्या आत पूर्ण करायची होती.
श्री देवानंद भोजे यांनी या रॅलीचे उद्घाटन केले. यावेळी अमरावती सायकलिंग असोसिएशन चे मेंबर्स मोठ्या संख्येने प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. रॅलीची सुरुवात जिल्हा स्टेडियम अमरावती येथून करण्यात आली . राईड चा शेवटचा फिनिश पॉईंट शेगाव नाका येथे होता. या राईड साठी प्रमुख राईड रिस्पॉन्सिबल म्हणून श्री पंकज सरकटे यांनी नियोजन केलं. अमरावती सायकलिंग असोसिएशन च्या इतर सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. या BRM 200 राईड मध्ये विनोदसिंग चव्हाण , कीर्ती बर्डिया, लक्ष्मीकांत खंडागळे , नरेंद्र भटकर, राजू धोटे , प्रशांत अगाव , अर्चना दुधे, विजय धुर्वे, रामराव उईकें, योगेश देशमुख, दर्शन महाजन, देवानंद मेश्राम, प्रकाश लिंगोट, नितीन सावरकर असे 14 रायडर सहभागी झाले होते. या 14 पैकी 2 महिलांचा सुध्दा सहभाग होता. विशेष बाब म्हणजे 14 रायडर पैकी 14 रायडर नी ही राईड निर्धारित वेळेत पूर्ण केली. त्यांचे अमरावती सायकलिंग असोशिअशन तर्फे अभिनंदन करण्यात आले. या आयोजनामध्ये अभिजीत साखरकर, रितेश जैन, प्रवीण जयस्वाल, राजूभाऊ देशमुख,डॉक्टर सागर धनोडकर, डॉक्टर सुरीता डफले, वैखरी कळमकर,केशव निकम, नितीन बोरगावकर, प्रविण खांडपासोळे सचिन पारेख यांनी मोलाचे सहकार्य केले